कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादकता वाढीसाठी चांगल्या वाणाच्या व शुद्ध बियाण्याची गरज आहे. हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे विक्रीलायक उत्पादन कमी मिळते. ...
पिकांना फवारणी द्वारे दिलेली अन्नद्रव्ये ही पिकास जमिनीतून द्यावयाच्या शिफारस केलेल्या अन्नद्रव्यास कधीही पर्याय होऊ शकत नसली तरीही काही कारणांमुळे अचानक निर्माण झालेली पानातील पोषकद्रव्यांची कमतरता ही अन्नद्रव्ये भरून काढतात. ...
राज्यात १५ डिसेंबरअखेर सुमारे ४० लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असली, तरी विमा मात्र ४९ लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविण्यात आला आहे. तब्बल नऊ लाख हेक्टरची तफावत आल्याने याचा थेट भुर्दंड राज्य सरकारवर पडणार आहे. ...