प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
प्रकाश राज यांनी नुकतीच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादावर कमेंट केलीय. त्यांनी आता कंगनाला टार्गेट करत एक मीम शेअर केलंय. ज्यात कंगना राणी लक्ष्मीबाई असल्याचं सांगण्यावरून खिल्ली उडवली आहे. ...