प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
Prakash Raj: तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्ष टीआरएसची मजबूत पकड असल्याने तिन्ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...
The Kashmir Files : नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला आहे. ...
प्रकाश राज (Prakash Raj) आणि पोनी वर्मा (Pony Verma) यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत ...