प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. ...
ठाणे जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागद वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजीविक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. ...
१८ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेजवळच्या उरी इथल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात १७ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं २९ सप्टेंबरला घेतला होता. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनविसेने समाचार घेतला असून शहरभर त्यांच्यावर टीका करणारे फ्लेक्स लावण्यात अाले अाहेत. ...