नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पहिला वाद मिटवून घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बाहेर नेऊन एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२) रात्री घडला. ...
चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ...
महामार्गावर वाहने लावून गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलनशील पदार्थाचा (इंधन) काळाबाजार करण्याचा प्रकार पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज स्वत:च कारवाई करून बंद पाडला. त्यामुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे. ...
देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग पाचव्या दिवशी घसरले आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती घसरून प्रतिबॅरल ६४ डॉलरच्या खाली स्थिरावल्यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांना छोटासा का होईना, दिलासा मिळाला आहे. ...