परभणी शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी, या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असून या संदर्भात येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चेअंती मंजुरी घेतली जाणार आहे. ...
शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली असून १० लाख रुपयांची विविध औषधी मागविली आहे. ही औषधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात पुढील तीन वर्षापर्यंतचा औषधसाठा उपलब्ध होणार आहे. ...
शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या उपांगांच्या कामांना गती देण्यात आली असून, धर्मापुरी येथे उभारल्या जाणाºया जलशुद्धीकरण केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित कामेही सुरू असून, मे महिन्यापर्यंत योजनेचे काम पूर्ण करण ...
शहरातील रस्त्यांची कामे मनपाने हाती घेतली असून, अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे़ त्यामुळे लवकरच शहरात रस्त्यांची कामे होणार असल्याने खड्ड्यांच्या त्रासातून मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे़ ...
महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या थकलेल्या ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन शनिवारी बँक खात्यात जमा केल्याने कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. कायम कर्मचाºयांबरोबरच रोजंदारी कर्मचाºयांत देखील वेतन जमा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही दिसून आला़ शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पाणी प्रश्नाबरोबरच स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठ्याची तरतूद करण्याची मागणी केली़ ...
येथील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अयोग्य नियोजनामुळे १३१़२८ कोटी रुपयांच्या निधीची अडवणूक झाली असल्याची बाब नागपूरच्या महालेखापालांनी केलेल्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ लेखापरीक्षणात मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत़ ...
येथील महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासूनचे पगार रखडल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत़ दसरा हा सण जवळ आला असून, या पार्श्वभूमीवर थकलेले पगार करावेत, अशी मागणी परभणी शहर महानगरपालिकेला सफाई कामगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़ चार ...