महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. ...
बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्मचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने सध्या रुग्णालयात फिल्मचा तुटवडा निर्माण झाला असून फिल्म अभावी एक्स-रे मशीन बंद राहत आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात येणाºया गोरगरीब रुग्णांना एक्स-रे क ...
राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे. ...
जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे. ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ९९.६० टक्के मतदान झाले असून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार असून या मत ...