जबरी चोरी तसेच वाळू चोरीचे गुन्हे दाखल असताना सुद्धा ८ वर्षापासून न्यायालयात अनुपस्थित राहून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात अखेर गंगाखेड पोलिसांना यश आले असून या तिघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्याला यावर्षी पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुकावासियांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ...
पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ...
विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़ ...
जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी व बोबडे टाकळी या गावांतील कृषीपंप धारांना व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात भजन, कीर्तन ...
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या जिल्ह्यातील ६१ कामांसाठी ५ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधी वितरणास तत्वत: मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला २ कोटी १६ लाख रुपये वितरित करण्यात आले ...