राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले असून शासनाच्या निर्णयातील काही अटींमुळे परभणी जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे. ...
घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आली. ...
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला अस ...
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ सरपंचांनी शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करून पडताळणी केली़ ...
गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ ...
येथील उपनगराध्यक्षपदासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत कॉँग्रेसचे गोपीनाथ लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेला काँग्रेसचे ३ व रासपचे ३ असे ६ नगरसेवक गैरहजर राहिले. ...
सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यातील चारही विद्यापीठांना निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ यातून सेंद्रीय शेतीसाठी संशोधन होवून बाजारपेठ, उत्पादन आणि निविष्ठांचा वापर याबाबत उपयुक्त काम केले जाईल, असे प्रतिपादन ...