राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
त्यांना (सुरज चव्हाणांवर) आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावले आहे. मी उद्या दिल्लीला चाललो आहे. तेथून आल्यानंतर त्यासंदर्भात आम्ही निर्णय घेऊ, असे तटकरे यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भातही भाष्य केले... ...
यासंदर्भात सुनील तटकरे यांनी, "मी 25 वर्षे आमदार राहिलो आणि आता 10 वर्षे लोकसभेचा खासदार आहे (राज्यसभेचा नाही) आणि प्रदेशाध्यक्ष आहे," असे म्हणत स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं. ...
लातूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...