राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maratha Reservation NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: मनोज जरांगेंच्या आंदोलनांचा सगळा खर्च शरद पवारांनी केला. शरद पवार सांगतात तसेच ते ऐकतात, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाने तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. परंतु, आयोगाने ही तिन्ही चिन्हे नाकारल्याचे समोर आले आहे. ...