राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर भर सभेत टीका केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे भाजपासोबत गेले होते. या भ्रष्टाचारावरून भाजपा सातत्याने राष्ट्रवादीला टार्गेट करायची. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे... ...
मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल असं आमदार दिलीप मोहितेंनी सांगितले. ...