राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उरलेले आहेत. राज्यात काय होईल, देशात काय होईल, वारे फिरतील की मोदी बहुतमताने निवडून येतील आदी चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच उमेदवारांसह त्यांच्या नेत्यांचीही धाकधूक वाढू लागली आहे. ...
छगन भुजबळांकडून जाहीरपणे फटकेबाजी केली जात असल्याने त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, विधानसभा निवडणुकीपूर्वी ते वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय, याबाबतही आता तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. ...
loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...
Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...