राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा दोन्ही गटांनी साजरा केला, यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदार सुनिल तटकरे यांनी विधानसभा निवडणुकांवरुन नेत्यांना सुनावलं. ...
Narendra Modi Oath Ceremony :मोदी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित झाले असताना त्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपद देऊ केल्यामुळे अडचण निर्माण होऊन पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. ...