नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केरळमधील अलपुझा येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल-टेनिस स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने १७ वर्षांखालील गटात विजेतेपदाला गवसणी घातली आहे. कोलकाताच्या नॅशनल कोचिंग सेंटरच्या शुभंकृता दत्ता हिला ४-० असे चारीमुंड्या ...
जिल्ह्यात रविवारी (दि.१९) तब्बल ३९ रुग्ण नवीन कोरोनाबाधित, तर २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या दीडशेपार जाऊन १५८ पर्यंत पोहोचली आहे. ...
माउली... माउली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगाचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा नामजप करीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातल ...
भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीवर शुक्रवारी ( दि.१७ ) कीर्तीदिनी नाशिकचे राजाभाऊ पाटणी व परिवाराच्या हस्ते महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी ७ वाजता मुख्य यजमान तसेच त्यांच्या पत्नी त्रिशलादेवी, पुत्र महावीर व शीतल, सुना नीलम, सुवर्णा, नातवंडे अक्षय, रोहन, ...
नांदगाव तालुक्यातील खादगाव येथे दहावीच्या परीक्षेत एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जनावरांना पाणी देत असताना विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे चर्चेला उधाण आले होते. ...