पंचवटी प्रभाग समितीच्या मासिक बैठकीत कोणतेही विषय पत्रिकेवर नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग बैठक तहकूब केली. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. ...
शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ता सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यासाठी भगूर मार्केट व परिसरातील दुकानदार, टपरीधारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या रस्त्याची अधिकाºयांनी पाहणी केली. ...
नांदुरवैद्य : जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या अनेक दिंड्या सोमवारी (दि.२८) अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे परिसरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण ...
सातपूर परिसरातील डॉक्टरांबरोबर शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सातपूर, त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्याच्याकडेला हा जैविक कचरा फेकण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यालगत लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यान व शाळा आहे. जैविक कच-यामुळे कावीळ, ...
पुणे येथील शिक्षण संचालनालयाने आॅक्टोबर २०१८ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव स्वीकारण्यास बंद केल्यानंतर उपसंचालक कार्यालयातही अडकू न पडलेली प्रकरणे व नव्याने सादर होणारे प्रस्ताव यात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे शिक्षकांचे शालार्थ आय ...
कळवण तालुक्यातील बिलवाडी, देवळीवणी, जामलेवणी, बोरदैवतसह दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. कळवण तालुक्यात दोन तासात भूकंपाचे सहा धक्के जाणवल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
रेशनवरील धान्य वितरणात पॉस यंत्राचा वापर न करणाºया जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची माहिती संग्रहित करून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली असून, मुदतीत आपले म्हणणे समाधानकारक न मांडल्यास अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही ...
विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...