‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. ...
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण व ढोल-ताशांच्या ठेक्यावर लाडक्या बाप्पांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत करून श्रींची गणेशचतुर्थीनिमित्त विधिवत प्रतिष्ठापना केली. ...
शहराला हादरवून सोडणाऱ्या या महापुराच्या खुणा अजूनही गोदाकाठावर कायम असून, संपूर्ण देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोदाकाठावर अजूनही गाळाचे ढीग, पुरासोबत वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि वेगवेगळ्या उंचवट्यांवर अडकलेला कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत ...
योगामुळे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक बलस्थाने भक्कम होतात. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करत केलेला जागतिक विक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. ...
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रकल्पाचा मुद्दा पुढे आला असून, सदर विषयाला राजकीय स्वरूप प्राप्त होण्यापूर्वीच येथील तरुणांनी प्रकल्प सुरू करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाचखोर सभापती चुंभळे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांना धोरणात्मक आणि आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये अन्यथा सचिव जबाबदार असतील, असे पत्र ...