वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:16 AM2019-09-03T01:16:40+5:302019-09-03T01:16:54+5:30

विभागीय यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुती बोरस्ते, सौरभ सोनार, शुभांगी ढोमसे यांनी बाजी मारली.

 Distribution of prize money for speech | वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

googlenewsNext

नाशिक : विभागीय यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुती बोरस्ते, सौरभ सोनार, शुभांगी ढोमसे यांनी बाजी मारली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवमहाराष्ट्र युवा अभियान व एच. टी. पी. कला, महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एच.पी.टी. महाविद्यालयात ही स्पर्धा पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत प्रा. मिलिंद मुरूगकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा.अनंत येवलेकर, डॉ.शंकर बोºहाडे, डॉ. राजेंद्र सांगळे, डॉ.संजय चपळगावकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर, प्राजक्ता नागपुरे यांनी केले.

Web Title:  Distribution of prize money for speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक