लोहोणेर : - देवळा तालुक्यातील सावकी येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या कीर्ती रमेश अवस्थी या तरुणीचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला असून यामुळे सावकी परिसरात खळबळ उडाली आहे. ...
इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेतील प्रवेश दिवसागणीक अडचणीत आणणारा ठरत असून, विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून मिळणाऱ्या संभाव्य उमेदवारीला ठिकठिकाणी बैठकांमधून होणारा विरोध आता फलकबाजीच्या माध्यमातून रस्त्यांवर येऊन ठेपला आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात असलेल्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे नुकसान होत असून, सीताबाई दिघे यांची अडीच एकरावरील कोथिंबीर पिकाचे काजळीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला ...
सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे अंगावर वीज पडून अलका शिवाजी बुरकुल व शेखर शिवाजी बुरकुल हे मायलेक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) घडली आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकणार असल्याची चर्चा पंधरा दिवसांपासून त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर तर हमखास शुक्रवारीच (दि.२०) आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली. ...
दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे. ...
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात दहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता या महिन्यातदेखील बुधवारपासून पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्र धास्तावलेला आहे. ...