किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:17 AM2019-09-21T01:17:11+5:302019-09-21T01:18:31+5:30

दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे.

In the retail market, onion is 5 rupees | किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो

किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो

googlenewsNext
ठळक मुद्देभावात वाढ : सर्वसामान्य नागरिक त्रस्त; आवक घटली

नाशिक : दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे याचा परिणाम किरकोळ बाजावर होत असून, बाजारात अत्यल्प प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. ज्या विक्रेत्यांकडे विक्रीसाठी कांदा शिल्लक आहे त्यांनी भावात मोठी वाढ केली आहे.
मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनासह चाळींमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याचेही नुकसान झाले. परिणामी कांद्याची आवक घटतच आहे. त्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून, शेतकऱ्यांचा उरलेल्या कांद्याचेही नुकसान होत असल्याने बाजार समितीत कांदा येत नसल्याने कांद्याला भाव मिळत आहे. नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर बाजार समितीमध्ये दररोज कांद्याचा भाव वाढत असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सगळ्याच बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी पाच हजारांपर्यंत भाव मिळत असल्यामुळे याचा थेट परिणाम किरकोळ विक्रेत्यांवर झाला असून, बाजारात कांदा ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. परिणामी कांदा खरेदी ग्राहकांना टाळावी लागत आहे.
आणखी भाव वाढण्याची शक्यता
काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, याचा परिणाम भाजीपाल्यासह कांद्यावर झाल्याचे दिसत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याने सुमारे ५ हजारांपर्यंत उसळी घेतल्याने परिणामी किरकोळ बाजारावर याचा परिणाम झाला आहे. दररोज कांद्याचे भाव प्रति क्विंटलमागे ५०० ते १ हजारांपर्यंत वाढत असून, यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडूनच कांदा खरेदी केला जात नसल्यामुळे शिल्लक असलेला कांदा खरेदीसाठीही ग्राहकच येत नसल्याचे विक्रेते सांगत आहे.
खाद्य पदार्थांतून
कांद्याचे प्रमाण कमी
कांद्याचे भाव वाढल्यामुळे हॉटेलसह अन्य लहान-मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कांद्याचा वापर कमी केला आहे. त्यामुळे मिसळसह, भेळमध्ये मिळणाºया कांद्याचे प्रमाण कमी झाले असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. काही ठिकाणी विक्रेते कांद्याला सपशेल नकार देत आहेत. वास्तविक कांद्याचा तुटवडा फारसा नसतानाही काही व्यापारी आणि किरकोळ भाजी विक्रेत्यांनी अधिक दराने विक्री सुरु केल्यामुळे कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव वाढले आहेत.

Web Title: In the retail market, onion is 5 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.