नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कळवण : कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आलेली असल्याने अनेकजण अडकून पडले. अटल आरोग्यवाहिनी योजनेअंतर्गत स्थलांतरित कर्मचाऱ्याच्या प्रसूत झालेल्या पत्नीला कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील देवमोगरा मूळगावी सोडण्यात आले. ...
दिंडोरी : तालुक्यातील उमराळे येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, विजय पवार यांच्या समवेत पाहणी केली. ...
चांदोरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
नांदगाव : गत दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्याने नांदगावचे बसस्थानकदेखील प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. बस रस्त्यावर न धावल्याने सुमारे अडीच कोटी रुपयांचा फटका नांदगाव बस आगाराला बसला आहे. ...
खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी एक एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरवित कोबीचे पीक उद्ध्वस्त केले. ...
चांदवड : सातत्याने दुष्काळ चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पूजला आहे. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात होत नाही, मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त व्हायचा असेल तर ४४ गाव नळयोजना व ४२ गाव नळयोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासुद्धा परिपूर् ...
ब्राह्मणगाव : येथील गावाला सायंकाळी होणारा सिंगल फेज वीजपुरवठा तीन-चार दिवसांपासून सारखा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने गावाला होणारा सायंकाळचा सिंगलफेज वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
कळवण : कामानिमित्त कळवण परिसरात असलेल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागल्याने प्रशासनाच्या सहकार्यातून कळवण येथून मध्य प्रदेशातील ४८ मजुरांना त्यांच्या ...