नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी २०२० मध्ये कंपन्यांच्या सीईओंना दोन-तीन वर्षे काही अतिरिक्त तास काम करण्याचा सल्ला दिला होता . आता त्यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. ...