केवळ 36 तास काम, तरीही अव्वल ठरतात; भारतातच कामाचे तास सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:08 AM2023-11-23T05:08:17+5:302023-11-23T05:08:56+5:30

भारतात मात्र आठवड्यात ४७.७ तास काम; उत्पादक क्षमताही कमी

Only 36 hours of work, but still tops; Working hours are highest in India | केवळ 36 तास काम, तरीही अव्वल ठरतात; भारतातच कामाचे तास सर्वाधिक

केवळ 36 तास काम, तरीही अव्वल ठरतात; भारतातच कामाचे तास सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करावे हे विधान जगभरातील तज्ज्ञ, संशोधन आणि अनेक अहवाल फेटाळताना दिसत आहेत. २०२३ च्या जगातील सर्वाधिक उत्पादक देशांच्या यादीने वेगळे मत तयार होत आहे. ज्या देशांमध्ये कामाचे तास कमी आहेत, तिथेच उत्पादक क्षमता जास्त आहे.

भारत हा जगातील सातवा देश आहे जिथे कामाचे तास जास्त आहेत. कामाचे तास अधिक असूनही उत्पादक क्षमतेत मात्र आपल्याला पहिल्या ४० देशांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. 

जगातील संशोधने असे सांगतात की, कामाचे तास ४० पेक्षा जास्त असल्यास उत्पादकता कमी होते. ६० तासांपेक्षा अधिक काम केल्यास उत्पादकता दोन तृतीयांशने आणखी कमी होते. आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त काम नसावे. तुम्हाला दरडोई उत्पादकता वाढवायची असेल, तर तुम्ही कामाचे तास न वाढवता कर्मचाऱ्यांकडून टीम वर्क करून घेणे महत्त्वाचे आहे.
-  हिमांशू राय, संचालक, आयआयएम, इंदूर

भारताची स्थिती काय? 
कामाचे तास अधिक असण्यात जगात भारताचा सातवा क्रमांक आहे. भारतात कामाचे तास दर आठवड्याला ४७.७ तास आहेत. बांगलादेशमध्ये हे प्रमाण ४६.९ तास, पाकिस्तानमध्ये ४६.७ तास, चीनमध्ये ४६.१ तास इतके आहेत. 

सर्वाधिक कामाचे तास असलेले देश

युएई    ५२.६ 
गांबिया    ५०.८ 
भुतान    ५०.७ 
लिसोटो    ४९.८ 
कांगो    ४८.६ 
कतार    ४८ 
भारत    ४७.७ 
मॉरिटानिया    ४७.५ 
लायबेरिया    ४७.२ 
बांगलादेश    ४६.९

Web Title: Only 36 hours of work, but still tops; Working hours are highest in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.