एकीकडे ‘कोरोना’चे संकट असतानादेखील प्रचंड गोंगाट करणाऱ्या गुंडांनी हटकणाऱ्यांवरच हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. केक कापताना हटकले म्हणून त्यांनी हटकणाऱ्याच्या घरावर दगडफेक करून बापलेकास मारहाण केली. ...
ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यां(सूक्ष्म पतपुरवठा संस्था)चा चांगलाच सुळसुळाट आहे. कुठल्याही कागदपत्रांविना या संस्था ग्रामस्थांना कर्जपुरवठा करतात. या पतपुरवठा संस्थांकडून सध्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड मानसिक पिळवणूक होत ...
महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग १ मधील मार्टिननगर, प्रभाग ११ मधील मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा ...
लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. काही अटी घालून शिथिलता दिली आहे. परंतु बहुसंख्य लोक अटी पाळत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. मागील आठ दिवसात नागपुरात रुग्णांच्या संख्येने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. तब्बल ३१० रुग्णांची नोंद झाली. यात आज ५८ रुग् ...
धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत ...
रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क, ग्लोव्हज व सॅनिटाझरची विक्री होताना दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधाला या गोष्टी किती योग्यतेच्या आहेत, या विषयी सावधानता बाळगून अशा उत्पादनांच्या वापर टाळायला हवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी (एनएमआरडीए) यांना माँ उमिया सोसायटीच्या जमिनीवरील ट्रान्सपोर्टनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी चार आठवडे वेळ वाढवून दिला. ...
लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढली आणि सोकावलेले गुन्हेगारही मोकाट सुटले. परिणामी अवघ्या महिनाभरात नागपुरात गुन्ह्याचा आलेख पावणेदोन पटीने वाढला आहे. ...