माता कचेरीनजीक असलेली ‘मी मराठी’ ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले. ...
गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-पॉईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला. ...
महापालिकेच्या आसीनगर झोन क्षेत्रातील कामठी रोडवरील इंदोरा येथील शैलेंद्र शाहू व इतर नऊ वहीवाटदार मे. विदर्भ डिस्ट्रीलर्स व पार्टनर आसवी निदशॉ बापूना व अन्य ११ नी केलेले गोडावूनचे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी व टिप्परच्य ...
नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. याची दखल घेत महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून येथे २४ तास डॉक्टर उपस्थित राहतील. नऊ डॉक्टरांची येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरु ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प अद्याप सादर न केल्याने नाराज झालेल्या सत्तापक्षाने महापालिकेची विशेष सभा १२ मार्चला बोलवली होती. परंतु बुधवारी प्रशासनाने ही सभा रद्द झाल्याचे पत्र जारी ...
नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत मनपातील सुमारे ४० टक्के पदे रिक्त असून, सफाई कर्मचारी गृहित धरले तर ही संख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. ...
तेलंखेडी, रामनगर येथील हनुमान मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून अतिक्रमण करून बांधण्यात आलेले डेकोरेशन मालकाचे शेड बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले. ...