हिंगणा टी-पॉईंटवरील आंगन गजालीचे बांधकाम तोडले, दंडही ठोठावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 08:54 PM2020-03-13T20:54:53+5:302020-03-13T20:56:21+5:30

गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-पॉईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला.

Construction of Angan Gajali at Hingana T-Point collapsed, fined | हिंगणा टी-पॉईंटवरील आंगन गजालीचे बांधकाम तोडले, दंडही ठोठावला

हिंगणा टी-पॉईंटवरील आंगन गजालीचे बांधकाम तोडले, दंडही ठोठावला

Next
ठळक मुद्देनागपुरातील २२ रुफ टॉप रेस्टॉरंट रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात विनापरवानगीने सुरू असलेल्या सर्व रुफ टॉप रेस्टॉरंटवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. अग्निशमन विभागाने अशा २२ रुफ टॉप रेस्टॉरंटची यादी तयार केली असून या सर्व रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-पॉईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत असलेल्या हिंगणा टी-पॉईंट टाकळी सीम येथील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रुफ टॉप रेस्टॉरंट गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. आंगन गजाली असे त्या रेस्टॉरंटचे नाव असून प्रसन्न दारव्हेकर हे त्याचे संचालक आहेत. हे रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वी अग्निशमन विभागाची परवानगी घेण्यात आली नाही शिवाय बांधकामासाठीही मंजुरी घेण्यात आली नाही. तेथे लाकडी तट्टे, लाकडी पार्टीशन, बांबू व किचनमध्ये एलपीजी गॅस अशा ज्वलनशील वस्तूंचा वापर होत असल्याचे मनपा अग्निशमन विभागाच्या लक्षात आले. यासाठी २४ नोव्हेंबर २०१६ आणि ३१ मार्च २०१८ ला नोटीस देण्यात आली होती. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष करीत संचालकांनी रेस्टॉरंट सुरूच ठेवले. अखेर आयुक्त मुंढे यांच्या निर्देशानुसार लक्ष्मीनगर झोन आणि अग्निशमन विभागाच्यावतीने कारवाई करीत अवैध असलेले संपूर्ण बांधकाम तोडण्यात आले. याव्यतिरिक्त १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

असा झाला लोकमत इम्पॅक्ट
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकमतने शहरात सर्रासपणे चालत असलेल्या रुफ टॉप रेस्टॉरंटवर वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर मनपा प्रशासनाकडून संबंधित रेस्टॉरंटची तपासणी करण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक सक्रिय झाले. फायर स्टेशनच्या सेंटरनुसार छतांवर संचालित रेस्टॉरंटची माहिती मागवण्यात आली. काही रेस्टॉरंटवर खानापूर्तीसाठी कारवाई झाली. त्यानंतर विधान परिषदेमध्ये नागो गाणारने लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करीत २५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रश्न उपस्थित केला. यावर सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या उत्तरासाठी राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून सविस्तर माहिती मागितली. त्यानंतर अग्निशमन विभाग व नगररचना विभागात खळबळ उडाली. आयुक्त मुंढे यांनी विभाग प्रमुखांना जाब विचारला. २७ फेब्रुवारी रोजी मनपाकडून उत्तर सादर करण्यात आले. यानंतर राज्य शासनाचे सतीश मोघे यांनी मनपा आयुक्तांना ६ मार्च २०२० रोजी पत्र जारी करीत रुफ टॉप रेस्टॉरंटच्या बांधकामाला प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत तपासणी आवश्यक असून तपासणीनंतर अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मनपा आयुक्त मुंढे यांनी नगररचना विभाग व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि यात कारवाई करण्याचे निर्देश दिले. शेवटी रुफटॉप रेस्टॉरंटच्या विरुद्ध कारवाई सुरू झाली.

२२ रूफ टॉप रेस्टॉरंट आयुक्तांच्या रडारवर
अग्निशमन विभागाने अशा २२ रूफ टॉप रेस्टॉरंटची यादी तयार केली आहे. या सर्व रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ज्या रेस्टॉरंटवर कारवाई होणार आहे, ते पुढीलप्रमाणे आहेत.
मे. अमरजीत रिसोर्ट प्रा.लि. हॉटेल सेंटर पॉइंट, प्रो. एस.पी. अरोरा व जसबिरसिंग अरोरा प्लॉट नं. १३१ए/१, मौजा सोमलवाडा, वर्धा रोड.
मे. हॉटेल प्राईड युनिक ऑफ जॅगसन हॉटेल पीआए सुरेशचंद्र पी. जैन, एअरपोर्ट समोर, वर्धा रोड.
मे. रोसेस्टा एलिट क्लब यशोधाम एनक्लेव्ह, प्रशांतनगर एफ.सी.आय. गोडाऊनच्या बाजूला अजनी.
मे. ३९ हाईट रूफ टॉवर मे. कोरल हॉटेल, प्रो. प्रा. अभिषेक खुशावार, प्लॉट नं. १२, १३, १४ मनीषनगर टी पॉइंट, बेसा रोड.
मे. सेव्हन सूट रूम अ‍ॅण्ड रेस्टारंट, प्रशांत मुळे, भोगवटदार कु. अल्का दिघोरीकर,अभ्यंकरनगर
मे. कोरीएंडर लीफ प्रो. प्रा. सचिन एस. महाजन, पाठक हाऊस, प्लॉट नं. ३३ व ३४, अभ्यंकरनगर.
मे. पटियाला हाऊस मे. हॉटेल हर्मीटेज प्रो.प्रा. रायपुरे व सुनील फुलझेले कन्नमवार नगर, वर्धा रोड.
मे. मोका स्काय, हॉटेल ट्रॅव्होटेल प्रो. प्रा. राजेश टेंभुर्णे कन्नमवार नगर, वर्धा रोड
रूफ ९ रेस्टॉरंट धरमपेठ, कॉफी हाऊस चौक.
तुली एम्पेरियल हॉटेल, रामदासपेठ, वेस्ट हायकोर्ट रोड.
चील अ‍ॅण्ड ग्रीन रेस्टॉरंट आणि लॉज, शिल्पी अजय बागडी, पहिला माळा, पूनम आॅर्केड, सीताबर्डी.
सीजन किचन ओपन रेस्टॉरंट ,माऊंट रोड, सदर.
श्री वली, ५०१ ओपन रेस्टॉरंट, ट्राफिक पार्कजवळ, धरमपेठ.
कारनेशन ओपन रेस्टॉरंट, माऊंट रोड, सदर.
मे. हेवन हायलाईफ रेस्टॉरंट, कार्र्तिक नायडू व इतर विट्स नागपूर कामत हॉटल लि. प्लॉट नं. ७ धंतोली, वर्धा रोड,
मे. वऱ्हाडी ठाट,गणेश चेंबर यशवंत स्टेडियमसमोर, धंतोली.
हॉटेल श्रवण, रमेश मोहता, झाशी राणी चौक.
मॅजिक फूड कोर्ट, जरीपटका रिंग रोड,
मे. आंगण गजानी, प्रसन्न दारव्हेकर, हिंगणा टी. पॉइंट, टाकळी सीम.
मे. व्हीला प्लॉट नं. १६७, अभ्यंकरनगर.
दि. टिंबर ट्रंक, गुड्डू बंसल, काचीमेट अमरावती रोड.
दि बिहाईन्ड दि बार, प्लॉट नं. ५, अध्यापक ले-आऊट, हिंगणा रोड.

Web Title: Construction of Angan Gajali at Hingana T-Point collapsed, fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.