केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी नागपूर महापालिका आणि नागपूर मेट्रोच्या पुढाकाराने येथील कृपलानी चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक म्युरलचे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. ...
नासुप्रच्या नगररचना विभागाची कामे महापालिकेच्या नगररचना विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. परंतु कर्मचारी समायोजनाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही व नासुप्र बरखास्तही झालेली नाही. त्यामुळे नासुप्र कर्मचारी व अधिकाऱ्यांचे महापालिकेतील समायोजन थांबले आहे ...
महापालिकेतील नगरसेवक व पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन शहराचा चौफेर विकास करण्याला गती देऊ , असा विश्वास भाजपचे महापौरपदाचे उमेदवार व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी व्यक्त केला. ...
सोमवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिकेतील विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या कक्षात घुसले. विरोधीपक्षनेता निष्क्रीय असल्याचा आरोप करीत त्यांना गोंधळ घातला. मुर्दाबादचे नारे देत खूर्च्यां फेकून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ...
२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. ...
उत्तर नागपुरातील २० वर्षापूर्वी वसलेल्या झोपडपट्टीधारकांची घरे तोडल्याने बेघर झालेल्या नागरिकांनी शनिवारी सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयावर धडक दिली. ...