सर्व कारंजे सुरू असल्याचा दावा : मनपाचा उघडपणे खोटारडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:33 PM2019-11-20T23:33:21+5:302019-11-20T23:34:44+5:30

शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे.

Claims All Fountain Started: Apparently False NMC | सर्व कारंजे सुरू असल्याचा दावा : मनपाचा उघडपणे खोटारडेपणा

सर्व कारंजे सुरू असल्याचा दावा : मनपाचा उघडपणे खोटारडेपणा

Next
ठळक मुद्देकोटींचा निधी पाण्यात

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ असे मोठमोठे दावे नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात येतात. मात्र कचरा रस्त्यांवर पडलेला असल्यामुळे स्वच्छतेच्या नावाने बोंब तर आहेच. दुसरीकडे सुंदर नागपूरसंदर्भातदेखील अनास्थाच दिसून येत आहे. शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे. यामुळे मनपाचे अधिकारी शहराच्या सौंदर्यीकरणाबाबत खरोखरच किती गंभीर आहेत व वास्तविक परिस्थितीची किती जाण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून मनपाचा खोटारडेपणाच उघड झाला आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे विचारणा केली होती. शहरात २०१६-१७ पासून पाण्याची किती कारंजे तयार करण्यात आले, यापैकी किती कारंजे बंद आहेत, कारंजे ‘मेन्टेन’ करण्यासाठी कंत्राटदारांना किती रक्कम देण्यात आली, तलावांतील कारंज्याची काय स्थिती आहे. मनपातर्फे मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१६-१७ या कालावधीत नागपुरात १३ ठिकाणी कारंजे बसविण्यात आले. यात सद्गुरु नगर उद्यान, महालक्ष्मी नगर, महात्मा फुले उद्यान, जगन्नाथ स्वामी मंदिराजवळ, शारदा चौकातील हनुमान मंदिराजवळ, गांधीबाग उद्यान, गांधीसागर तलाव, दर्शन कॉलनी उद्यान, शनिवारी क्वॉर्टर्स, रामपेठ, बडकस चौक, विवेकानंद स्मारक येथील कारंज्यांचा समावेश आहे. ‘लोकमत’ने या ठिकाणांची पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी कारंजे सुरूच नसल्याची बाब समोर आली. कारंजे बसविण्यासाठी ९५ लाख ७४ हजार ७६४ रुपये खर्च करण्यात आले तर कारंजांच्या देखरेखीसाठी व दुरुस्तीसाठी २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत १४ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु जर कारंजे दुरुस्त झाले तर मग अनेक कारंजे बंद का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तलावांतील कारंजे बंद
शहरातील फुटाळा तलाव व गांधीसागर तलाव येथे गाजावाजा करुन कारंजे लावण्यात आले होते. मात्र हे दोन्ही कारंजे बंदच असल्याचे दिसून आले. मनपाने हे दोन्ही कारंजे बंद असल्याचे माहिती अधिकारात नमूद केले आहे, मात्र याचे नेमके कारण मात्र स्पष्ट केलेले नाही.

Web Title: Claims All Fountain Started: Apparently False NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.