नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ पालिकेत लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. आता त्या गावांना अ दर्जाच्या पालिकेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे रोजगार हमी योजनाच राबविता येत नाही. ...
महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असतानाही या सुट्टीचा सदुपयोग करत, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी रंकाळा तलावाची पाहणी केली. विशेष म्हणजे सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी रंकाळा तलावाची सहा किलोमीटरची पायपीट केली. ...
कुडाळ नगरपंचायतीमार्फत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा वीजनिर्मिती प्रकल्प इमारतीचे काम करण्यासाठी गेलेल्या नगरपंचायत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेरूर येथील प्रभाकर उर्फ गणेश गावडे, सहास मुळम व सुवर्णा कदम ...
सटाणा : शहरातील पाणीपुरवठा विहिरीवर करण्यात आलेल्या २३ लाख रुपयांच्या खर्चाची रक्कम सटाणा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दडविल्याचे उघडकीस आल्याने फिर्यादी अभियंत्यासह अन्य अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दिलेल्या फिर्यादीत ही लाखोंची रक्कम दडविली गेल्याची ...
रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली. अतिक्रमणविरोधी पथकाने दिलेल्या सुचनांनुसार व्यावसायिकांनीही या मोहिमेला सहकार्य करीत आपले बस्तान हलवून रस्त ...
गडचिरोली नगर परिषदेने अर्थिक वर्ष संपण्याची चाहुल लागताच कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मागील दोन ते तीन वर्षांपासून कर थकित आहे अशा ३०० थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ...
कोल्हापूर शहरातील कूळ वापरातील वाणिज्य मिळकतींचा घरफाळा काही प्रमाणात कमी करण्यावर महानगरपालिकेचे प्रमुख पदाधिकारी ठाम असून, उद्या शनिवारी होणाऱ्या महापालिका सभेत स्थायी सभापती शारंगधर देशमुख त्यासंदर्भात घोषणा करणार आहेत. ...
कोणतीही मोठी दरवाढ न करता सावंतवाडी नगरपालिकेने आपला २९ कोटी शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला. पाणीपट्टी आरोग्य तसेच घरपट्टी आदींना कुठेही हात न लावता तसेच नागरिकांवर या अर्थसंकल्पाचा कोणताही कराचा भार येणार नाही. याची पुरेपुर काळजी नगरपालिकेने घेतली आहे ...