सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ७ महिन्यांनंतरच्या स्थायी समितीच्या बैठकीला ६४७ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी २७५ प्रस्ताव कोरोनाशी निगडित होते.स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भालचंद्र शिरसाट यांच्या सदस्यत्वाबाबत हरकत नोंदविली. ...
‘आम्ही पालिकेला आवश्यक ती व्यवस्था करण्याची परवानगी देतो. जे सदस्य बैठकीत उपस्थित राहण्यास इच्छुक आहेत, ते उपस्थित राहू शकतात आणि सभेतील विषयांवर चर्चा करू शकतात,’ असे न्यायालयाने म्हटले. ...