मुंबई, पुण्याला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून होणारा दूधपुरवठा रोखण्याचे आंदोलन गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून केले जाईल. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारात हे आंदोलन केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ...
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची मागणी घटत गेली. ...
कोरोनामुळे संपूर्ण हॉटेल व्यवसाय बंद पडला; शिवाय मुंबई, पुणे व अन्य शहरातून लोक गावाकडे परतल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. ...