राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवारी - बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात बुधवारी सर्वाधिक लसीकरण ठाणे जिल्ह्यात झाले असून, हे प्रमाण ...
लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत. ...
आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती. ...
लसीकरणाच्या टक्केवारीवरही याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुंबईत डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोविड लसीकरणाचा विधिवत प्रारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. देशातील ३०० दशलक्ष लोकांना लस देण्यात येईल, असेही मोदी म्हणाले होते. ...
शनिवारी एमजीएम रुग्णालय व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला होता. यातील एकालाही रिॲक्शन झाली नाही, अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. येथील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस दे ...