मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
उत्तर प्रदेशात धार्मिक धु्रवीकरण करण्यात आले. त्याचा परिणाम हिंदुत्वाचे कार्ड चालविल्यामुळे आणि मुस्लिम मतदारांनी देखील भाजपला साथ दिल्याने सपा-बसपाला मतदारांनी नाकारले आहे. ...
भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे. ...
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची भेट घेणार होत्या. मात्र बसपाने आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मायावती सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे. ...
लोकसभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशबाबत मात्र विविध एक्झिट पोलमधून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आकडेवारीबाबत संभ्रम वाढला आहे... ...