मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देणे बंधनकारक असावे, अशी मागणी करण्यात आली आहे ...
मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याच्या मागणीला राज्य सरकारने हरताळ फासला आहे. नवी मुंबईत ही वास्तु उभारण्याचा घाट घातला जात असून केंद्राऎवजी उपकेंद्र उभारण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. ...
मराठी चित्रपटांसाठी थिएटरच्या निर्मितीसाठी जागा व परवानगी मिळावी, चित्रपट निर्मितीसाठी मिळणारे सरकारी अनुदान वाढविण्यात यावे, नोटाबंदी व जीएसटीमुळे मराठी चित्रपट निर्मितीवर परिणाम झाला असल्याने त्याबाबत योग्य विचार व्हावा, वृद्ध कलावंतांच्या मानधनाच् ...
राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्य ...
मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे. ...