प्रतिगामी शक्ती, झुंडशाहीविरोधात साहित्यातून ठाम भूमिका हवी : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:53 AM2019-09-23T11:53:05+5:302019-09-23T11:54:01+5:30

सत्तेच्या सावलीत साहित्याची वाढ खुंटते. स्वतंत्र वातावरणातच उत्कृष्ट साहित्य निर्मिती होऊ शकते...

Literature against the repressive force, oppression should play a strong role: father fransis dibreto | प्रतिगामी शक्ती, झुंडशाहीविरोधात साहित्यातून ठाम भूमिका हवी : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

प्रतिगामी शक्ती, झुंडशाहीविरोधात साहित्यातून ठाम भूमिका हवी : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड : अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही 

पुणे : सत्तेच्या सावलीत साहित्याची वाढ खुंटते. स्वतंत्र वातावरणातच उत्कृष्ट साहित्य निर्मिती होऊ शकते. त्यामुळे संविधानाने बहाल केलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रतिगामी शक्ती, झुंडशाही विरोधात साहित्याने ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी स्पष्ट भूमिका नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 'लोकमत' प्रतिनिधीशी बोलताना मांडली. साहित्य आणि समाज यांच्यात फरक करताच येणार नाही. त्यामुळे अध्यक्ष म्हणून साहित्य व्यवहाराचा मागोवा घेतानाच समाजातील, देशातील सध्याच्या स्थितीवर भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सन्मानाने झालेल्या निवडीनंतर काय भावना आहेत?
ल्ल साहित्य महामंडळाने गेल्या वर्षापासून संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. गेली अनेक वर्षे निवडणुकीचा फड गाजत होता. निवडणुकीमुळे आपल्याला शिवाजी सावंत आणि दया पवार यांच्यासारखे दोन मोठे साहित्यिक गमवावे लागले. त्यामुळे निवडणूक रद्द करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. मागील वर्षी वाचकांनीही या निर्णयाचे स्वागत केले. पुणे : उस्मानाबाद येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महामंडळाच्या बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब झाले. दिब्रिटो यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘‘संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप आनंद होतो आहे. यानिमित्ताने मोठी जबाबदारी खांद्यावर आली आहे. मराठी साहित्य व्यवहार खूप व्यापक आहे.  त्यामुळे अध्यक्ष म्हणून साहित्य व्यवहाराचा मागोवा घेतानाच समाजातील, देशातील सध्याच्या स्थितीवर भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन,’’ अशी भावना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सध्या समाजात धार्मिक उन्माद पाहायला मिळत आहे. जाती-धर्मातील विखार, झुंडशाही याकडे साहित्यिकाच्या नजरेतून कसे पाहता?
ल्ल  धार्मिक उन्माद आपोआप निर्माण होत नाही. प्रतिगामी शक्ती स्वार्थापोटी हेतूपूर्वक हा उन्माद निर्माण करत असतात. धर्मासारख्या चांगल्या गोष्टीचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केला जातो. धर्म माणसाला परमात्म्याचा मार्ग दाखवतो. धर्माची सकारात्मक बाजू न पाहता राजकारणातील वृत्ती धर्माचा गैरवापर करत आहेत. प्रभू ख्रिस्त म्हणतात की, देवाचे देवाला द्या आणि समाजाचे समाजाला द्या. दुर्दैवाने, या तत्त्वाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. ‘अहिंसा परमो धर्म’ हा संदेश आपल्या देशाने जगाला दिला आणि आता आपल्यालाच त्याचा विसर पडला आहे.

विशिष्ट विचारसरणीचे साहित्य घरात ठेवणे 
हा गुन्हा मानला जाणे योग्य आहे का ?
ल्ल सामान्य माणसाच्या खासगी आयुष्यात शासनाचा हस्तक्षेप अयोग्य आहे. उद्या आपण काय अन्न खावे, हेही शासन ठरवू लागेल. सामान्य लोक उन्मदाचे बळी ठरतील. कोणी काय वाचावे, काय खावे, काय बोलावे हे ठरवण्याचा अधिकार शासनाला मुळीच नाही.
प्रतिगामी शक्तींमुळे आपण मागे चाललोय का?
ल्ल हिंसा, झुंडशाहीमुळे आपण पुन्हा मागे प्रवास करत आहोत. झुंडशाही, जातीय दंगलींमध्ये कोणीही मोठा नेता मारला जात नाही. दंगलीचे परिणाम सामान्यांना भोगावे लागतात. राजकारणातील चुकीच्या धोरणांमुळे होणारे नुकसान परवडणारे नाही. महासत्ता होण्याचे स्वप्न अशाने कसे पूर्ण होणार? आर्थिक मंदी, बेकारी हे प्रश्न आ वासून उभे आहेत.
अध्यक्ष म्हणून साहित्य व समाजाबद्दल काय भूमिका मांडाल?
ल्ल साहित्य आणि समाज यांच्यात फरक करताच येणार नाही. समाजाची सुख-दु:खे हीच साहित्याची सुख-दु:खे असतात. समाजातील घटनांची साहित्यिकांनी नोंद घेतली पाहिजे. मी सामाजिक बांधिलकी मानणारा मनुष्य आहे. लेखणीच्या माध्यमातून लेखकाने चुकीच्या गोष्टींविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे. समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून प्रतिबिंबित होत असतात. 

Web Title: Literature against the repressive force, oppression should play a strong role: father fransis dibreto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.