मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
बंगळुरूतील एका खासगी हॉटेलात काँग्रेसच्या झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षप्रमुखांना नेता निवडीचे अधिकार देणारा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. ...
कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी रविवारी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी अधिकृत केले, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. ...
एखाद्या इमारतीचा पाया खचला, तर कळसाची अवस्था ही कधीही कोसळेल, अशी हाेते, तसेच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत घडले. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना उंच उंच मनोऱ्यावरील कळसाच्या तळपण्यावर लाेकांची मते सहज जिंकून घेऊ, असे अतिआत्मविश्वासाने सांगितले गेले. मात्र ...
भाजप आणि काँग्रेसमधील सत्तासंघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याभोवती केंद्रित झाला असला, तरी गेल्या सहा महिन्यांपासून त्याला जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील स्पर्धेचीही किनार लाभली आहे. ...