मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. ...
समितीने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या नऊ राज्यांमध्ये युती व्हावी, अशी शिफारस केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या I.N.D.I.A.च्या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...