मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती. Read More
सर्व आराेपींना हजर राहण्याचे निर्देश, विशेष न्यायालयाचे न्या. पी. आर. सित्रे यांनी दोनच दिवसांपूर्वी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते ...
2008 Malegaon blast case: पुरोहितच्या वतीने ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बिलालच्या मध्यस्थी अर्जाला विरोध केला. राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) कलम १९७ अंतर्गत पुरोहितविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी मंजुरी घेतली नाही. ...
लष्करात कर्तव्यावर असताना पुरोहितवर गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदारी दंड संहितेनुसार, त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सरकारकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ...
विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, तरीही आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या वकिलांना याची आठवण करून दिली. ...