Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे उमेदवार आता स्वत:च प्रचारासाठी व्हिडीओदेखील व्हायरल करीत आहेत. पूर्व नाशिक मतदारसंघात एका इच्छुकाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. यात झुंड में तो सुअर आते हंै, टा ...
ब हुतेक सन १९९५ ची ती निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यावेळी रिंगणात मुरलीधर माने, डॉ. दौलतराव आहेर हे मातब्बर उमेदवार होते. त्यांचे कार्यकर्ते ठरलेले, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकत्यांचा गोतावळा मोठा होता. ...
विधानसभा निवडणुकीत होणारा पैशांचा वापर आणि व्यवहारावर निवडणूक शाखेचे लक्ष असतेच, आता बॅँकांना उमेदवारांच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली. ...
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानासाठी सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे हे आता तळमजल्यावर आले आहेत. ...
तीस वर्षे मतदारसंघ ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेनेला यंदा देवळाली मतदारसंघाची वाट बिकट दिसू लागली असून, मतदार आम्हाला ओळखतात त्यामुळे प्रचाराची गरज काय अशा आविर्भावात विद्यमान आमदार योगेश घोलप यांची वाटचाल सुरू असल्याने त्याचा नेमका फायदा विरोधी इच्छुकांनी ...