Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत दावेदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत अनेक इच्छुकांना धास्ती आहे. तथापि, निवडणूक लढविण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याने उमेदवारी नाकारल्यास अन्य पक्षांकडून उमेदवारी करण्याची तयारी सुरू झा ...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, नेत्यांच्या सभा किंवा यात्रा होणार असेल तर पक्षचिन्ह असलेली टोपी किंवा मफलर हमखास वापरली जाते. मात्र अशा प्रकारच्या प्रति मफलर आणि टोपीसाठी दहा रुपये मोजावे लागतील. याशिवाय कापडी बॅनर्स तसेच अन्य प्रचारांचे ...
आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असेल; पण कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसेल तर उमेदवाराची निवडणुकीमध्ये अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होते. महाराष्ट स्थापनेपासून झालेल्या बारा विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातून ६६१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून ...
निवडणूक कामात समन्वयाची आणि प्रत्यक्ष कामकाजात महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ सुपरवायझर यांना प्रतीवर्षी १२ हजार रुपये मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे बीएलओ पर्यवेक्षकांमध्ये ...
माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी किंवा पत्नी ज्योती कलानी यांना थेट उमेदवारी दिली तर आपल्यावर टीका होईल, याची जाणीव झाल्याने भाजपने कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत ...
विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात शनिवारी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक हजर झाले आहेत. ...
कल्याण पश्चिम मतदारसंघ युतीत शिवसेनेला घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असली तरी येथे विद्यमान आमदार असल्याने फॉर्म्युल्याप्रमाणे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती प्रदेश ...