Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
कोणत्याही सुज्ञ व्यक्तीस राजकारण हे क्षेत्र आणि राजकारण्यांविषयी मळमळ वाटू लागेल, अशी आज या क्षेत्राची अवस्था आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये अधोगती सुरू आहे; मात्र राजकारणात तर अधोगतीनेही तळ गाठला आहे. ...
भांडुप विधानसभामधून तिकीट नाकारल्याने विद्यमान आमदार अशोक पाटील यांनी मातोश्री गाठली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याने त्यांनी मातोश्रीबाहेरच ठिय्या केला. ...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आलेली वरळीची लढत आणि भाजप श्रेष्ठींनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित, सरदार तारासिंग यांना दिलेल्या डच्चूमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. ...
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ राहुल गांधी करतील. उच्च पदस्थ सूत्रांनुसार दहा ते १९ आॅक्टोबर दरम्यान गांधी महाराष्ट्रात जाहीरसभा, रोड शो आणि जनसंपर्क अभियान चालवतील. ...
राज्यातील जागावाटपात भाजप मोठा भाऊ असला, तरी मुंबईत मात्र शिवसेनेकडे जादा जागा आल्या आहेत. जागावाटपातील शिवसेना नावाच्या मोठ्या भावाला निकालातही आपले थोरलेपण राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे ...