Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे. ...
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततेत पार पाडावी व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी सोमवारी दिंडोरी शहरातून पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेतील चार सदस्य रिंगणात असले तरी, त्यापैकी राष्टÑवादीचे हिरामण खोसकर या एकमेव सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द केला असून, त्यांचा राजीनामा मंजूर करून त्याची माहिती राज्य निवडणूक आ ...
भाजपची देशात सत्ता आली तर ते राज्यघटना बदलतील असे सातत्याने सांगितले जाते, मात्र सर्वप्रथम राज्यघटना बदलण्याचे पाप कॉँग्रेसनेच केले. राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असतानादेखील जम्मू आणि काश्मीरसाठी ३७० कलम घुसवण्यात आले होते आणि तेच आ ...