दिंडोरीत पोलिसांचे सशस्त्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:40 AM2019-10-15T01:40:32+5:302019-10-15T01:41:27+5:30

विधानसभा निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततेत पार पाडावी व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी सोमवारी दिंडोरी शहरातून पोलिसांनी सशस्त्र संचलन केले.

Armed movement of police in Dindori | दिंडोरीत पोलिसांचे सशस्त्र संचलन

दिंडोरीत पोलिसांचे सशस्त्र संचलन

Next

दिंडोरी : विधानसभा निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततेत पार पाडावी व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी सोमवारी दिंडोरी शहरातून पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तहसील कार्यालयापासून पालखेड रोड, जामा मस्जीद, मारु ती मंदिर, मोठा वाडा, जुना कळवण रोड, पालखेड चौफुली यामार्गे संचलन करत पोलीस स्टेशनमध्ये समारोप करण्यात आला. तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बोरसे यांनी केले, यावेळी राजेंद्र लहारे, युवराज खांडवी, नंदू वाघ आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Armed movement of police in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.