Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
भाजपा मागासवर्गीयांची विरोधक आहे, असा गैरसमज सातत्याने पसरविला जात आहे, मात्र भाजपा मागासवर्गीय विरोधी नाही, अशी ग्वाही भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले. ...
कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ...