once again Fadnavis government; BJP wins 122 out of 164 seats- survey | Maharashtra Election 2019 : फिर एक बार फडणवीस सरकार; 164पैकी 122 जागांवर भाजपाचा विजय 

Maharashtra Election 2019 : फिर एक बार फडणवीस सरकार; 164पैकी 122 जागांवर भाजपाचा विजय 

मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपानं अंतर्गत सर्व्हे केला आहे. या अंतर्गत सर्व्हेत भाजपाला 164पैकी 122 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला ही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या 40 ठिकाणी अटीतटीची लढत होणार असून, दोन ठिकाणी  भाजपाला नुकसान होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भाजपाला बारामती आणि मालेगावमध्ये पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असाही एक अंदाज आहे. मतदानाआधीच भाजपानं अंतर्गत सर्व्हे केला आहे, त्या अंतर्गत सर्व्हेतील निष्कर्ष भाजपानं मांडले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेला सोबत न घेता भाजपा सत्ता स्थापन करेल, अशीही अटकळ भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनंतर बांधली जात आहे. 
 
परळी, वांद्रे पश्चिम आणि कराडमध्ये कडवी झुंज होणार असून, 164 पैकी 122 जागांवर भाजपाला विजय मिळताना दिसतोय. पण तरीही यातील दोन जागांवर भाजपाला पराभव स्वीकारावा लागू शकतो, अशीही शक्यता आहे. त्या दोन जागा म्हणजे बारामती आणि मालेगाव विधानसभा मतदारसंघ आहेत. या दोन जागांवर युतीचा पराभव होत असल्याचं अंतर्गत सर्व्हेतून दाखवण्यात आलं आहे. सर्व्हेमध्ये दाखवलेल्या 40 जागांपैकी काही जागांवर युतीतलेच बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. साकोलीच्या जागेवरूनही परिणय फुके भाजपाकडून लढत असून, त्यांच्यासमोर नाना पटोलेंचं आव्हान आहे. यवतमाळमध्येही मदन येरावार यांच्यासमोर आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढत असलेल्या आशिष शेलारांसमोरही अडचणी आहेत.  

या मतदारसंघात होणार अटीतटीच्या लढती 
मालाड पश्चिम-
अस्लम शेख, भाजपाचे रमेश सिंग
वर्सोवा- भारती लव्हेकर- भाजपा पुरस्कृत, बलदेव कोसा-काँग्रेस 
कणकवली- नितेश राणे- भाजपा,  सतीश सावंत-शिवसेना
कर्जत-जामखेड- रोहित पवार, राष्ट्रवादी, राम शिंदे- भाजपा
दक्षिण कराड- पृथ्वीराज चव्हाण- काँग्रेस, अतुल भोसले- भाजपा 
पंढरपूर- भारत भालके- राष्ट्रवादी,  सुधाकर परिचारक- भाजपा 
कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज पाटील- काँग्रेस, अमल महाडिक- भाजपा
परळी- पंकजा मुंडे- भाजपा आणि धनंजय मुंडे- राष्ट्रवादी
लातूर- अमित देशमुख, भाजपाचे शैलेश लाहोटी
चिखली बुलढाणा- राहुल बोंद्रे विरुद्ध श्वेता महाले
साकोली- परिणय फुके विरुद्ध नाना पटोले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: once again Fadnavis government; BJP wins 122 out of 164 seats- survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.