Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला. ...
संविधानाचे रक्षणकर्ता एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी यशोधरानगर येथील जाहीर सभेत केले. ...
परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचारात व्यस्त असून, त्यांच्या कार्याने प्रभावित कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्यासमवेत येत आहेत. केवळ राज्यातच नव्हे तर अगदी सातासमुद्रापलीकडेदेखील फडणवीस यांच्यासाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. ...