लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भामरागड तालुक्यातील जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मंगळवारी मुक्तिपथ गाव संघटनांची बैठक घेऊन ही निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवा ...
ठिकठिकाणच्या अवैध दारू विक्रेत्यांकडे छापेमारी करून पोलिसांनी लाखोंचा दारुसाठा जप्त केला. या प्रकरणी गिट्ठीखदानमधील पितापुत्रासह वर्धा जिल्ह्यातील वाहनचालक आणि कामठीतील एक महिला अशा एकूण पाच जणांना अटक केली. ...
मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क खात्यातर्फे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे अठराशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. तर पंधराशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी ...
तालुक्यातील परसवाडी टोला येथे मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृतीद्वारे २० दारूविक्रेत्यांना नोटीस दिली. सहा जणांच्या घराची झडती घेत व आसपासच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडके मोहसडवा आणि गावठी दारू जप्त करून ती मंगळवारी नष्ट केली. ...
गोंदिया जिल्ह्यातून गेवर्धा मार्गे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पोलिसांनी अडवून या वाहनातील २८ पेट्या देशी दारू जप्त केल्याची कारवाई बुधवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास गेवर्धा-केशोरी मार्गावरील खैरी फाट्याजवळ करण्यात आली. ...
दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु ...
लोकसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त केल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच ...
चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले. ...