तालुक्यातील परसवाडी टोला येथे मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृतीद्वारे २० दारूविक्रेत्यांना नोटीस दिली. सहा जणांच्या घराची झडती घेत व आसपासच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडके मोहसडवा आणि गावठी दारू जप्त करून ती मंगळवारी नष्ट केली. ...
गोंदिया जिल्ह्यातून गेवर्धा मार्गे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पोलिसांनी अडवून या वाहनातील २८ पेट्या देशी दारू जप्त केल्याची कारवाई बुधवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास गेवर्धा-केशोरी मार्गावरील खैरी फाट्याजवळ करण्यात आली. ...
दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु ...
लोकसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त केल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच ...
चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले. ...
कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खुर्शीपार येथे धाड टाकून सुमारे ५८ लाख ८३ हजार ४५० रुपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली. ...
शहर पोलिसांनी स्थानिक पुलफैल परिसरात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूगाळण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात गावठी मोह दारू असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...