जिल्ह्यातील अर्जुनी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात या आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. ...
वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी विजय झाडे हे शुक्रवारी सकाळी शेतातून घरी परत जात असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...
मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत. ...
पाच ग्रामस्थांना जखमी करून पळालेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच आहे. वन खात्याचे १५ कर्मचारी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत ही शोध मोहीम राबवत आहेत. आता मुंबईच्या मदत पथकाची वन खात्याला प्रतीक्षा आहे. ...
औद्योगिक कंपनीच्या कुंपणावर बसलेला बिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला. ...
येथील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...