जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. ...
पांडवलेणी परिसरातील राखीव वनक्षेत्र घोषित असलेल्या डोंगरावर विनापरवाना ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तीस वर्षीय युवकावर बिबट्याने चाल करत पंजा मारला. मात्र चढावरून बिबट्याचा तोल गेल्याने तो खाली घसरल्यामुळे ट्रेकर्स थोडक्यात वाचला. ...
पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे. ...
आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यावेळी वासराजवळच बांधलेल्या गाईने आरडाओरडा केल्यामुळे धारबळे कुटुंबीयांच्या लक्षात आले. ...